“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा, जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”

0
245

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत शेलारांनी राऊतांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच संजय राऊतांवर टीका करताना शेलारांनी ठाकरे सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा, मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्याकडून मोठी चूक झालीय. त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”

“शशिकांत शिंदे आणि मी एकच; शिवेंद्रराजेंची होणार राष्ट्रवादीत घरवापसी?”

महाराज आज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here