आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भीतीपोटी हे बंड झालं आहे, याला शिवसैनिकच उत्तर देतील. काही काळानंतर या बंडाला निश्चितच उत्तर मिळेल, असं पेडणेकर म्हणाल्या.
हे ही वाचा : भाजप इंग्रजांचं धोरण राबवतेय; नाना पटोलें संतापले
घराचे वाशे फिरले की घरही फिरते. हे बंड भितीपोटी झाले आहे. चंद्रकांत पाटील त्याच दिवशी म्हटले काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, आता त्यांनाही कळेल कुठले दगड ठेवले. या सर्वांची किंमत मोजवी लागेल, योग्यवेळी शिवसैनिकच या बंडाला उत्तर देतील, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं ते जनता विसरणार नाही, त्यामुळे येत्या काळात बंडखोरांना नागरिकांच्या त्रासाची किंमत मोजावी लागेस, असा इशाराही पेडणेकरांनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान
संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
“शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”