मुंबई : राज्यात कोरोनामुळे निर्बंध घातलेले असताना महाराष्ट्रातील भाजपने ते निर्बंध खुले करण्यासाठी आंदोलन केलं होतं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे उघडा, ते उघडा काही जण म्हणत आहे. महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकावत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनं अशा उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये, असं उद्धव ठाकरें म्हणाले. उद्धव ठाकरेंनी काल जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान, कोरोना गेला आहे, तर दुकानं खुली ठेवावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो 24 तास दुकानं उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढली तिथे रुग्ण वाढले आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिर खुली करण्यासाठी 8 दिवस लागणार आहे. लोकांचा संयम सुटत चालला आहे पण संयम ठेवावा लागणार, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मोदी-जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?”
घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका
कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे