आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहात असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं, यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला
हे ही वाचा : …म्हणून ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडली; मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट
धनुष्यबाण गेले म्हणून उद्धव ठाकरे रडत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून त्यांनी अनेक विजय आणि पराभव पाहिले; पण ते खचून कधीच रडले नाहीत. त्याचप्रमाणे राज ठाकरेसुद्धा कधीच रडले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार हे फक्त राज ठाकरेंकडेच आहेत, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
बाळासाहेबांनी कधी सत्तेचे पद घेतले नाही. आता जनता बाळासाहेबांची छबी राज साहेबांमध्येच बघत आहेत. असं सांगतानाच राज ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो आहोत, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
“मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीसाठी आशिष शेलार-शरद पवारांची युती”