मुंबई : दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असं शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणा बाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही, असं अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.
भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा_ शरद पवार
मराठा आरक्षणा बाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही.@abpmajhatv pic.twitter.com/wicVA8kwqs— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 30, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान राॅयल्सवर धमाकेदार विजय”
5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; थिएटर, शाळा राहणार बंद
बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं- संजय राऊत