Home महाराष्ट्र पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

पवार-शहांची भेट राजकीय नाही, सहकार विषयावर चर्चा होण्याची शक्यता- प्रवीण दरेकर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुन्हा केंद्रीय गृहमंत्री व देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

ही राजकीय भेट आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. सहकार संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते, असं मत प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवार हे थोड्याच वेळात संसदेत अमित शहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. अमित शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकाराच्या मुद्द्यांवर शरद पवार नव्या केंद्रीय सहकार मंत्र्यांना भेटणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

‘माझी नको ती बदनामी केली; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

तुम्ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहात, हे समजून घ्या- नवाब मलिक

“लाईव्ह सेशन चालू असताना अभिनेत्री गहना वशिष्ठला न्यूड पाहून चाहत्यांना बसला धक्का; पहा व्हिडिओ”

संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट; संजय राऊत – राहुल गांधी भेटीमागचं कारण काय?