Home महाराष्ट्र “देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावेत”

“देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावेत”

मुंबई : डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या 9-10 बैठका झाल्या. त्यात तोडगा निघाला नाही. आता चर्चा करायलाही तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते योग्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांवर निशाणा साधला.

इतके वर्ष केंद्रात मंत्री राहून त्यातले अनेक वर्ष देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या पवार साहेबांनी आता तरी शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे प्रयत्न सोडावे. आज कृषी दिनानिमित्त प्रश्न पडतो की जर पवार साहेब कृषी तज्ञ व इतके वर्ष कृषीमंत्री राहिले तरी महाराष्ट्राचा शेतकरी समाधानी का नाही., असं ट्विट करत निलेश राणेंनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

“विश्वजीत कदम आणि पृथ्वीराज चव्हाणांना धक्का; डॉ.अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा दणदणीत विजय”

“घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचं 2 दिवस राज्यव्यापी आंदोलन”

“मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये”

“मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा फटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली”