पवार कुटुंबिय आणि पक्षांत उभी फूट पडली आहे; सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस

0
222

मुंबई | कर्नाटक नंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. यावर पवार कुटुंबिय आणि पक्षांत उभी फूट पडली आहे, असं व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवलं आहे.

सुप्रिया सुळे माध्यमांसमोर आल्या खऱ्या मात्र त्यांना बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी दुपारी माध्यमांशी सविस्तरपणे बोलेन, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आमदारांच्या हजेरीसाठी त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. मात्र त्याचा दुरुपयोग करण्यात आला. तेच सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठिंबा पत्र म्हणून सादर करण्यात आलं, असा आरोप नवाब मलीक यांनी अजीत पवारांनर केला आहे.

दरम्यान, अजित पवारांवर राष्ट्रवादी कारवाई करण्याची शक्यता, शरद पवार संयुक्त पत्रकार परिषदेसाठी वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here