पंढरपूर : पवारसाहेब तुम्ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची काळजी करु नका. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, इकडचा कार्यक्रम आमचं आम्ही करतो, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजयाचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरवलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील हे पंढरपुरमध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवत असल्यामुळे 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शरद पवार पोटनिवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता, ते म्हणाले, शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सल्ल्याने ते बाहेर पडतील. या मतदारसंघाची काळजी करु नका असं सांगितलं आहे. तसेच प्रचाराला कोण नेते येतील याचं नियोजन लवकरच होईल, असं जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
पार्थ पवार यांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”
‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य