“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

0
3211

सांगली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा” असं म्हणत धनंजय मुंडे प्रकरणावरून टोलेबाजी केली.

श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल माणूस मी आयुष्यात कधी पाहिला नाही. पाटील असाच असावा लागतो. पण धनंजय मुंडेंचं जे काही प्रकरण सुरू आहे. तसा पाटील आम्हाला नकोय. तसा पाटील सिनेमा, नाटक आणि साहित्यात रंगवला गेलाय. तो प्रत्यक्षात नको, असं श्रीपाल सबनीस म्हणाले.

दरम्यान, आटपाडी तालुक्यातील माडगुळे येते महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पुण्याच्या गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही- जयंत पाटील

“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”

“मी सुद्धा खासदार आहे, असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here