“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात”

0
323

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसिद्धीची गरज आहे म्हणून ते वीजबिलावरून आरोप करत आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात. त्यामुळे नको ती वक्तव्ये करण्यापेक्षा आपण सर्वसामान्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच विनंती, असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटलांना टोला लगावला आहे.

दरम्यान, जयंत पाटील आज मंत्री आहेत. ऊर्जा मंत्रीही आपल्या सरकारमधील आहे. वीजबिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लुबाडण्याचं काम होतं आहे. त्यामुळे सरकार म्हणून तुम्हाला हा जाब विचारण्यात आला आहे. कोणाला प्रसिद्धीची गरज आहे हे सर्व जनतेला माहिती आहे, असंही रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी

साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला- निलेश राणे

“कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण”

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज; निलेश राणेंचा हल्लाबोल

जेवढे आमचे नगरसेवक फोडले त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here