मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता राखता आली नाही. निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी 205 जागा जिंकण्याचा दावा केला होता. यावर काँग्रेस नेते व मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोलाही विजय वडेट्टीवारांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी लगावला.
निवडणुकांचे योग्य नियोजन केलं असतं तर कोरोना वाढला नसता. 5 राज्याच्या निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने 6500 कोटी रुपये कोरोना लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी ठेवले आहेत. तसेच आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किती मानतं हे पाहावं लागेल. तसेच लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी केंद्राला केला.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी मग्रूरपणे बोलू नये- रुपाली चाकणकर
‘आयपीएल’वर कोरोनाचं सावट! KKR चे 2 खेळाडू पाॅझिटिव्ह; आजचा सामना पुढे ढकलला
“तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल”
“भारतनाना माफ करा, तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले”