पॅट कमिंसची घातक गोलंदाजी; कोलकाताची राजस्थानवर 60 धावांनी मात

0
161

दुबई : आजच्या आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान राॅयल्स राजस्थान राॅयल्सचा 60 धावांनी पराभव केला.

कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावत 191 धावा केल्या. कोलकाताकडून कर्णधार इयाॅन माॅर्गनने सर्वाधिक 35 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने 34 चेंडूत 39 धावा, शुभमन गिलने 24 चेंडूत 36 धावा, आंद्रे रसेलने 11 चेंडूत 25 धावा केल्या. तर राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3, कार्तिक त्यागीने 2, तर जोफ्रा आर्चर व श्रेयस गोपालने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 20 षटकात 9 गडी गमावत 131 धावाच करू शकला. राजस्थानकडून जाॅस बटलरने 22 चेंडूत 35 धावा, राहुल तेवतियाने 27 चेंडूत 31 धावा, श्रेयस गोपालने 23 चेंडूत 23 धावा केल्या. तर कोलकाताकडून पॅट कमिंसने 4 विकेट घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती व शिवम मावीने 2 विकेट, तर कमलेश नागरकोटीने 1 विकेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी-

“नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत”

“एकनाथ खडसे यांचा जळगावकडे परतत असताना अपघात”

तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफांचे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तरी काही केल्या तुटत नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here