“पक्ष माझ्या बापाचा आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही”

0
238

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे,’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

‘माझ्यावर पदासासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मी लवकरच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा उद्धाटन करणार आहे. मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारीमध्ये लाक्षणिक उपोषण करणार असल्याची मोठी घोषणाही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्नांसाठी आपण संघर्ष करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here