मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी केली होती. यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवारांच्या या मागणीवर माझा मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे. मी त्यांना 50 वर्षांपासून ओळखतो. पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास असून सुशांत आत्महत्येच्या सीबीआय चौकशीला माझा विरोध असण्याचं काय कारण, मी या चौकशीला विरोध करणार नाही, अशी रोखठोक भूमिकाही शरद पवार यांनी मांडली.
महत्वाच्या घडामोडी-
‘हा’ फोटो ट्विट करत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
“बेळगावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला”
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, तत्काळ नागपूरच्या रूग्णालयात हलवलं
“बाळासाहेब थोरात खोटं बोलत आहेत, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही”