Home महाराष्ट्र परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा...

परळी आहे सुन्न, मान खाली गेली आहे राज्याची; करूणा शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडले आणि, त्याहीपेक्षा नाट्यमय घटना म्हणजे ते पिस्तूल शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत टाकत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला.

करूणा शर्मांवर अॅट्राॅसिटीचा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. यातच जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्व प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!, असं पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“लाचखोर नवऱ्याच्या बायकोचे नाव वाघ असले म्हणून, मांजर वाघ होत नाही”

शिवसेना आणि संजय राऊत तोंडावर पडले; बेळगाव निकालानंतर निलेश राणेंचा घणाघात

“हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करून लाज वाटली नाही का?

माझा मुलगाही खोटारड्या वाघांबरोबर नेहमी खेळतो; मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं