मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे.
परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित वृत्त पीटीआयच्या हवाल्यानं समोर आलं आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणारं हे दुसरं पत्र आहे. याआधी मुंबईतीलच एका पोलीस अधिकाऱ्याने अशाप्रकारे आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवलं होतं. मात्र, आता अकोल्यात मुख्य नियंत्रण कक्षामध्ये काम करणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने हे पत्र पाठवलं आहे. तसेच हे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पाठवण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
लसींच्या दराबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान गप्प का?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
“कर्नाटकात उद्यापासून 14 दिवसांचा लाॅकडाऊन”
“…त्यामुळे महाविकास आघाडीतील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये”
“संकटाला संधी मानून महाविकास आघाडी कधीच राजकारण करत नाही”