Home महाराष्ट्र पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…

मुंबई : पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडेही बोस्टनला गेल्या असून. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय, अशी बातमी सोशल मीडियावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा देतो. पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा, लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घरं भरणाऱ्या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, कसयं? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे, तुमच्या लहान भगिनी प्रीतम मुंडे या खासदार आहेत, तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, असं म्हणत खेडकर यांनी पंकजाताईंना साद घातली.

प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्तीग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या उपचारासाठी मदत, कोविड 19 मध्ये कोरोना केंद्र, पूरग्रस्त लोकांसाठी मदतफेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आहे. कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकेल- संजय राऊत

“टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा जलवा, प्रवीण कुमारनं उंच उडीत पटकावलं राैप्य पदक”

“सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, 2 नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश”

“शिवसेनेचा इतिहास सर्वांना माहीत आहे, शिवसैनिक कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाहीत”