आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नुकत्याचं झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात दिसल्या होत्या. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्ष टोले लगावले.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना चिकनचा रस्सा बनविण्याचा टास्क दिला होता. मात्र, चिकन रस्सा बनविण्यासाठी लागणारं सामान घेताना पंकजा मुंडे खोबरं आणण्याचं विसरल्या. त्यामुळे कार्यक्रमाच्या फाॅर्म्यटनुसार, पंकजा यांना शिक्षा मिळाली. यावरून पंकजा यांनी, मला नेहमीचं ‘मी न केलेल्याची शिक्षा मिळते,’ असा टोला लगावला. यावरून रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देिली.
हे ही वाचा : “केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ.भारती पवार यांना कोरोनाची लागण”
पंकजा ताई सगळ्यांनाचं खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या, असा टोमणा रोहित पवारांनी भर कार्यक्रमात पंकजा मुंडेेंना लगावला. यावर पंकजा यांनी, ‘मी तुम्हाला आमत्रंण द्यायला तयार आहे. तुम्हाला जे आवडतं. ते खायला घालायची कला माझ्याकडे आहे,’ असा प्रतिटोला लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत; शिवसेनेची टीका
“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, मराठा मावळा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
…म्हणून मंत्रालयाचा आधीचा पत्ता कृष्णकुंज, आत्ताचा शिवतीर्थ; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला