औरंगाबाद : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही”, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी-
“शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा”
“पुरंदर विमानतळ बारामतीला हलवण्याचा शरद पवारांचा डाव”
लेकीला शिकवा, तिच्या पंखांना बळ द्या; बालिका दिनानिमित्त अमृता फडणवीसांकडून आवाहन
…तर मुख्यमंत्री पदाचं महत्व काय?; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका