आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल; किशोरी पेडणेकरांनी केली पोलिसात तक्रार
12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्याच वेळी 12 डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. हा संकल्प पूर्ण करणार का, असा सवाल पंकजा मुंडेंनी या पत्रातून केला आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला- राज ठाकरे
“ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री किरीट सोमय्यांच्या रडारवर; ट्विट करत दिली माहिती”
“खासदार संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची भेट, तर्कवितर्कांना उधाण”