जळगाव : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या राज्याच चर्चा सुरू आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं वक्तव्य करत गुलाबराव पाटील यांनी चर्चेला उधाण आणलं आहे. ते टी.व्ही. 9 मराठीशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे आहे. यामुळे त्यांच्या वारसदाराला कुठेतरी न्याय, सन्मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत राहील. त्यांना शिवसेनेत स्थान व सन्मान मिळेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून, सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला. तसेच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे हे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही गुलाबराव पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’; आमदार रोहित पवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
“कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पाहणी करत असताना एकमेकांना समोरासमोर भेटले”
“…तर त्यांचे हातपाय तोडू, हा महाराष्ट्र आहे, इथं फक्त राज ठाकरेंचं राज चालतं”