“पंकजा मुंडेनंतर आता युवासेना सचिव वरूण सरदेसाई कोरोना पाॅझिटिव्ह”

0
407

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच राज्यातील काही मोठ्या नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, महसूलमंत्री यांसारख्या मोठ्या नेत्यांनंतर आता युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा : “नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो, माझ्या नादी कुणी लागू नये”

वरूण सरदेसाई यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढल्यानंतर चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन वरूण सरदेसाई यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युवासेनेने आपला झंझावात हा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“मोदी अहंकारी आणि हुकूमशाहीवृत्तीचे; 700 शेतकरी त्यांच्यामुळेच मेले”

सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये नारायण राणेंची भर; अजित पवारांचा खोचक टोला

पंकजा ताई काळजी घ्या आणि लवकर बरं व्हा : रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here