बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरुन पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात; म्हणाल्या…

0
655

लातूर : माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की घोटाळ्यावरुन धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर जोरदार टोला लगावला होता. यावर पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. लातूरमध्ये आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलिही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलिही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यात जनता, व्यापारी, व्यावसायिक प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. वाळूमाफिया वाढले आहेत. अवैध दारु, मटक्याचे अड्डे वाढले आहेत. आम्ही रोज पोलिसांना बोलतोय. हे सर्व बीड जिल्ह्यासाठी हानीकारक आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

“शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांची ‘या’ कारणासाठी होणार चाैकशी”

ओबीसींच्या हक्कासाठी कौटुंबिक संबंध बाजूला ठेवून लढायलाही तयार; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मनसे नेत्याच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?; चित्रा वाघ यांनी केला संताप व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here