Home महाराष्ट्र संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला

संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला

मुंबई : राज्यात सध्या करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यातच सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सात दिवस मुंबईची लोकल सेवा बंद केल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखता येईल, असं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई बंदची मदत होऊ शकते का? जर नियोजनबद्ध पद्धतीनं मुंबई बंद केली तर लोकं जीवनावश्यक वस्तू घरात आणून ठेवतील. जर सात दिवसांसाठी लोकल सेवा बंद ठेवल्यास लाखो लोकांना करोनाच्या संसर्गापासून रोखण्यास मदत होईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, लोकांना आवश्यक असेल त्या वस्तूंच्या विक्रीची दुकांनं उघडी ठेवण्यात यावी,” अशा आशयाचं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच निधन

“सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटलेत; राष्ट्रवादीचा पलटवार

शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे

आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसताय- रुपाली चाकणकर