पंकजा मुंडेंना बोलताना भान राहत नाही; धनंजय मुंडेंचा पलटवार

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलाय, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला आज पंकजा मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, अशी टीका करणाऱ्या धनंजय मुंडे यांनीच बाबासाहेबांनी दिलेल्या अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला, खोटी अ‍ॅट्रॉसिटी लावली, यापुढे बीड जिल्ह्यात असे प्रकार चालणार नाहीत, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. यावरून धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीची ताकद वाढणार; बार्शीचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?”

पंकजा मुंडेंना बोलताना त्यांना भान राहत नसल्याचे म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर पलटवार केला. बीड जिल्ह्याची बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे. इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला, असं आवाहन धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ स्टार प्रचारकाने केला भाजपमध्ये प्रवेश

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान

धनंजय मुंडेंनी अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला; पंकजा मुंडेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here