मुंबई : पालघरमधील एका गावात गुरूवारी रात्री लोकांनी 3 साधूंना ठार मारल्याची घटना घडली होती. पालघरमधील घटना ही लज्जास्पद असून दोषींवर कारवाई होणारचं अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 19, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची आठवण येतेय”
“मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे”
“महाराष्ट्र आणि मुंबईमधील आकड्यात काहीशी घट, पण भ्रमात राहायचं नाही”
ठाकरे सरकार करणार 12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपयांची मदत