शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही हे पडळकरांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील

0
303

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार  यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडळकर  यांचं म्हणणं योग्यच आहे. “गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मराठा आरक्षणप्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल मी वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, 3 जून 2014 रोजी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. आज 7 वर्ष झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“गोपीनाथ मुंडे आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं”

शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही- गोपीचंद पडळकर

‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे- गोपीचंद पडळकर

मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here