पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला

0
306

नागपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं असून त्यात हरवलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा, अशी मागणी पडळकर यांनी या पत्रात केली आहे. यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांवर निशाणा साधला.

पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता उगवलेलं गवत आहे. त्यांना काय माहीत आहे?, असा उपरोधक टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पडळकर हे अज्ञानी बालक आहेत. ते आता आता राजकारणात आले आहेत. ते नवीन उगवलेलं गवत आहेत. त्यांना अजून आपलं मूळ सापडलेलं नाही. अनेक ठिकाणी मूळ शोधून आलेला हा व्यक्ती आहे. ती कमिटी स्थापन करायचं काम मी केलं आहे. त्या पडळकरांना काय माहीत आहे?, असा घणाघात वडेट्टीवारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

पंकजाताई, 2024 च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत- करूणा मुंडे

चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले

राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा पोरींवर उडवत आहेत; करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here