आमचं तीन पक्षाचं सरकार ‘अमर,अकबर,अँथनी’ प्रमाणे हिट होणार; नाना पटोलेंचं दानवेंना प्रत्युत्तर

0
509

जालना : अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत, असं वक्तव्य भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमर, अकबर, अँथनी हा सिनेमा दानवेंनी बहुदा बघितला नसेल. अमर, अकबर, अँथनी हे पात्र अन्याय, अत्याचाराविरोधात होते. लोकांना न्याय देणारे होते. म्हणून तो सिनेमा खूप हिट झाला होता. तसेच आमचे तीन पक्षाचे हे सरकार त्याच पद्धतीने जनतेमध्ये हिट होणार आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

हे तीन पक्षाचे सरकार फार काळ ठिकणार नाही. हे एकमेकांच्या पायात पाय घालूनच पडणार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. आम्हाला हे सरकार पाडण्यात काहीही रस नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भावना केंद्रापर्यंत पोहचवणार- आदित्य ठाकरे

…पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधले; चंद्रशेखर बावनकुळेंचे पवारांना प्रत्युत्तर

भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले

“मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उद्यनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here