आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : लवकरच शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याच्या टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमधून शिंदे गटावर तोफ डागण्यात आली आहे. यावरून आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
हलक्या मनाचे कुचक्या वृत्तीचे आतल्या गाठीचे आणि शिवसेनेपासून दूर गेलेलं नेतृत्व आज आमच्यावर टीका करत आहेत. पण आपणच हिंदुत्वाच्या विचारांपासून पलायन केलेलं आहे. आपणच पळकुटे आहात, असं म्हणत ठाकरे गटाला नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ही बातमी पण वाचा : ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्याच्याबद्दल…; शरद पवारांची बावनकुळेंवर बोचरी टीका
दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात तोफ डागत होते. त्यांच्याच सोबत आज तुम्ही आहात. बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे, आमचा मेळावा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा मेळावा असणार आहे, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
वारसा हा खऱ्या विचारांचा असायला हवा सडक्या मनोवृत्तीचा नको, ओरिजनल विचार शिवसेनाप्रमुखांचे आमच्याकडे आहेत, आझाद शिवसैनिकांचा आझाद मेळावा हा आझाद मैदानावर असणार आहे, असंही नरेश म्हस्के यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा असे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात.
महत्त्वाच्या घडामोडी –
मराठा आरक्षण कधी लागू करणार? मंत्री शंभुराज देसाई यांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…
“महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण”
“माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, अन्…”