“तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत”

0
159

पाटणा : विरोधीपक्ष पूर्णपणे सहकार्य करत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून भाजपा सरकारसोबत आहे. महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत. विरोधी बाकांवर बसलेलो असलो, तरी आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, करोनाच्या संकटात आम्ही कसलंही राजकारण करणार नाही,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्रात करोनाचं मोठं संकट आहे. आजघडीला 10 लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. देशात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसाला 23 ते 25 हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आमच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटावर अधिक लक्ष दिलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची बिहारची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या ते विविध भागांचा दौरा करून आढावा घेत आहेत. आज बौद्धगया येथे झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी- 

मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे या हल्ल्याचे समर्थन; नवनीत राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“मुंबई असो कि महाराष्ट्र एकच ब्रँड छत्रपती शिवाजी महाराज”

ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही भविष्यात फटका बसेल- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here