Home नागपूर ‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं

‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

चंद्रपूर : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? याचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रे घेतले आहे. अशातच मनसेनेही आपल्या मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा : ‘.. या कारणासाठी राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते एकाच मंचावर’ ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शिवसेनेनंतर आता मनसेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे प्रतिज्ञापत्रे भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे प्रतिज्ञापत्रे भरून दिले आहे. मनसैनिकांकडून अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रे भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते वरोरा येथे आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्रे भरून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच राज यांनी चंद्रपुरातील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रे भरून देण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; बाळासाहेबांच्या विश्वासू सेवेकरीनं शिंदे गटात केला प्रवेश

“राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ पिता-पुत्राला ट्रीपल धक्का; आधी विधानसभा, मग ग्रामपंचायत, आता ‘या’ निवडणुकीतही बसला पराभवाचा धक्का”

मराठा आरक्षणाबाबत विरोधकांवर बोलताना शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली, म्हणाले…