संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू; नाना पटोलेंचा टोला

0
265

मुंबई : काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून दिला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांच्या मार्गदर्शनातच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांच्याकडूनच आम्ही शिकत असतो. तेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. तसेच आम्हाला भाजपकडून काहीच शिकण्याची कोणतीच गरज नाही असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला; अमृता फडणवीसांनी फोटो शेअर करत दिली माहिती

“वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त वाघाचं राज्य”

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी”

बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here