Home देश आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी

आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: आमच्या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीमधून बाहेर काढत शिस्त लावली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते गुरुवारी दिल्लीत उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’च्या वार्षिक संमेलनात बोलत होते.

पाच-सहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्था संकटाकडे वाटचाल करत होती. मात्र, आमच्या सरकारने अर्थव्यवस्थेला केवळ स्थिरताच दिली नाही तर शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

आम्ही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उद्योगक्षेत्राच्या मागण्यांकडे लक्ष पुरवले. त्यामुळे आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते. पण आमचं सरकार हे 130 कोटी भारतीय जनतेचे एंजट आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये औपचारिक व्यवस्था निर्माण केली. तसंच तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थव्यवस्थेला आधुनिक आणि गतीमान केले, असा दावा मोदींनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

-“पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत पडू नका”

-भाजपाचे नेते कोणी आपल्याकडे बघत नाही ना, याची खात्री करून माझ्यासोबत हात मिळवणी करतात

-ट्रेलर रिलीजनंतर छपाकची खरी ‘हिरो’ असणारी लक्ष्मी अग्रवाल नाराज

-महाराष्ट्र आपल्या आक्रमकतेला साथ देईल असं जर भाजपला वाटत असेल तर भाजप मूर्ख- जितेंद्र आव्हाड