आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याच्या काही भागात झालेल्या हिंसाचारात भाजपचा हात आहे. असा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते करत आहे. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राज्यात तीन तीन पक्षाचे सरकार असताना आमचा त्यांना धाक आहे. याचे प्रमाणपत्र त्यांनीच दिले आहे. राज्यात कुठलीही घटना घडली तर आम्ही ती घडवून आणली, असं सांगितलं जातंय. हे किती हस्यास्पद आहे हे. सुरुवात कोणी केली हे बघा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ
रझा अकादमीवर बंदी घालण्याची आमची मागणी आहे. उद्या भाजच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसेच रझा अकादमीची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एकही दंगल झाली नव्हती. पण यांच्या काळात मुस्लिम विभागात कोव्हिड नियमांमुळे पोलिसांना मारहाण झाली. आता काय सुरू आहे ते बघा, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा
कंगणानं केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर…; ओवैसी कडाडले
“मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”