आमच्या गाडीला ब्रेक नाहीत,गाडी वेगाने पुढे चालली- संजय राऊत

0
171

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं आहे

सत्तास्थापनेचा दावा शनिवारपर्यंत करण्यात आता मला कुठलीही अडचण दिसत नाही. ज्या वेगाने आम्ही पुढे निघालो आहोत. आता आमच्या गाडीला ब्रेक नाहीत. ब्रेक काढलेत. गाडी वेगाने पुढे चालली आहे,असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना- काँग्रेस -राष्ट्रवादी ही महाआघाडी आहे इतकच मला माहीत आहे. बाकी सर्व आपआपल्या पद्धतीने तिचं नामकरण करत आहेत, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here