Home महाराष्ट्र …अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील

…अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणी नसेल तर प्रवेश नाकारला जात आहे. यावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारने तपासणी नाका उभारला आहे. आरटीपीसीआर तपासणी झाली असेल तरच महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. यामुळे वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. यातून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सतेज पाटील म्हणाले.

दरम्यान, देश आणि जगभरातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तपासणी करून त्यांना गरज वाटल्यास क्वारंटाईन करण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी घ्यावी, अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू, असंही सतेज पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे”

“मध्यप्रदेश हादरलं! भाजपच्या पदाधिकाऱ्यासह चाैघांनी 20 वर्षाच्या तरूणीवर केला बलात्कार”

माझं महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचं आवाहन की…; राजेश टोपे यांच रुग्णालयातून पत्र

गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला पाहिजे- किरीट सोमय्या