मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे, असा टोलाही राऊतांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ ना हाताशी धरुन महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडवता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला , हवा येऊ द्या!”, असंही सामनामधून म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं”
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही- बाळासाहेब थोरात
जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार
…त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती; पश्चिम बंगाल निवडणुकीवरुन फडणवीसांचा टोला