Home महाराष्ट्र अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य

अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल; काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याचे वक्तव्य

मुंबई : काँग्रेसमधील 23 वरिष्ठ नेत्यांनी काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाचे नेतृत्व आणि कामकाजाबद्दल असहमती दर्शवणारे पत्र लिहिले होते. या पत्रावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही सही केली होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जर पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्याने नेतृत्व केले, तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करु शकेल, अन्यथा पुढील 50 वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल, असा इशारा गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला चार दिवस उलटल्यानंतर नियुक्त केलेल्या कॉंग्रेस अध्यक्षांना पक्षात एक टक्काही पाठिंबा नाही, असंही गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलाच नाही, तर मग…; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सांभाळता येत नाही, आणि…; संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पृथ्वीराज चव्हाणांना निवडून येण्यासाठी शरद पवारांची मदत घ्यावी लागते, तर हरकत काय? बाळासाहेब थोरातांचा राऊतांना प्रतिप्रश्न

देवेंद्र फडणवीस देशातील सर्वोत्तम विरोधी पक्षनेता; संजय राऊतांनी केलं कौतुक