कल्याण : गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
राज्य सरकारने विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राला पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे स्थानिकांनी मात्र रायगडमधील लोकप्रिय नेते दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केली.
विमानतळाला कोणाचं नाव देण्यात यावं यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राला पाठवण्याची तयारी सुरु केली आहे, तर दुसरीकडे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यावर पनवेलचे उपमहापाैर जगदीश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून थांबवलं पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. तसेच ‘मातोश्री’ला घेराव घालण्यात येणार असल्याचा इशाराही जगदीश गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतांचा जावईशोध; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
“पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर आमचे नेते त्यांचा योग्य मानसन्मान करतील”
शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे…; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य
“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”