मुंबई : काल संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल online बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल., असं ट्विट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण”
….तर ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का?; आशिष शेलारांचा सवाल
के.एल राहुल व ख्रिस गेलची शानदार फलंदाजी; पंजाबचा आरसीबीवर शेवटच्या चेंडूवर विजय
उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या नेत्याला शिवसेनेचं प्रत्युत्तर