मुंबई : मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर सरकारमधील एकाही मंत्र्याला गावात फिरू देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.
ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामळे अनेकांना पदोन्नतीपासून वंचित रहावं लागणार आहे. सरकारच्या या गलथान कारभाराचा फटका मागास्वर्गीयांना बसला आहे. एसी, एसटी, ओबीसी समाजाचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे, असा आरोप पडळकरांनी यावेळी केला.
दरम्यान, यावेळी बोलताना गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. मंत्रिगटाची एक बैठक होते आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला जातो हे सगळं ठरवून केलं जात आहे. अजित पवारांनी या बैठकीत काय केलं ते सगळ्या राज्याला सांगाव, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, हा उठावडेपणा; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
“भाजप नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार”
मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
अजित पवारांनी शब्द पाळला; देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला एका दिवसात बेड्या