Home देश …अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही; रोहित पवारांचा केंद्र सरकारला...

…अन्यथा तुर्कीसारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही; रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यघटना आणि लोकशाहीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.

राज्यघटनेचा गाभा असलेल्या संघराज्य पद्धतीला जपण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून केंद्राची आहे. पण आज या गाभ्यालाच तडा जातो की काय, अशी भीती वाटू लागलीय…. याकडं जागरूक नागरिक, अभ्यासक, पत्रकार यांनी डोळसपणे पाहून त्याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.., असं ट्विट करत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


दरम्यान, लोकशाही सशक्त करण्यासाठी सत्तेचे अधिकाधिक विकेंद्रीकरण आवश्यक असतं. अन्यथा तुर्कीसारख्या देशामध्ये ज्याप्रमाणे लोकशाहीचे पतन होऊन हुकुमशाहीचा प्रकोप झाला तशी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? नाईट कर्फ्युवरून मनसेचा शिवसेनेला टोला

सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“आम्ही कोणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला तयार आहेत”

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”