“…नाहीतर तुझं करिअर बरबाद करेन, अशी धमकी देत प्रशिक्षकानंच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार”

0
171

मुंबई : काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरमधील माखरिया नावाच्या हायस्कूलमध्ये दिलीप ढेबे या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. ती घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका कुटूंबाने आपल्या 14 वर्षाच्या मुलीला बाॅक्सिंगचा क्लास लावला होता. मात्र, मुंबईच्या चेंबूर परिसरात एका बॉक्सिंग प्रशिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 14 वर्षाची असून ती या प्रशिक्षकाकडे बाॅक्सिंगचे धडे घेत होती. काही दिवसांपूर्वी सदर मुलीची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा तिला चांगलं वाटावं म्हणून फिरायला न्यायच्या बहाण्याने त्याने तिला त्याच्या घरी नेलं आणि संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेनंतर, ही गोष्ट जर बाहेर कोणाला सांगितली तर तुझं बाॅक्सिंग करिअर बरबाद करेल, अशी धमकीही या प्रशिक्षकाने पीडित मुलीला दिली.

दरम्यान, धमकीला न घाबरता पीडित मुलीनं पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि त्यानुसार पोलिसांनी टिळकनगर येथून त्या नराधमाला अटक केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आयपीएल सुरू होण्याआधी RCB ला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूनं घेतली माघार

नागपूरमध्ये 21 मार्चपर्यंत कडक लाॅकडाऊन- नितीन राऊत

राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत चालेल- संजय राऊत

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, 3 महिन्यात सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here