बीड : पाटोदा तालुक्यातील शहीद जवान तुकाराम राख यांना 2010 मधील ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले. स्वतःचा पती गेल्यानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही वीरपत्नी भाग्यश्री कुटूंबाचा गाडा चालवतच राहिल्या. शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. पण अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत भाग्यश्री यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 8 दिवसात जमीन मिळेल असं आश्वासन देऊन 8 महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही मला न्याय मिळालेला नाही म्हणून 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार असल्याचा इशारा शहिद वीरपत्नी भाग्यश्री राख यांनी दिला आहे.
दरम्यान, शहिदांच्या वारसांना दोन हेक्टर जमीन देण्यात यावी असा शासननिर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील लालफितीच्या कारभारामुळे भाग्यश्रींनी आता टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव
आमच्या सरकारला काहीही धोका नाही, आमचे सगळे पूल भक्कम- संजय राऊत
शरद पवारांनी घेतलेली ‘ती’ भूमिका योग्य- देवेंद्र फडणवीस