नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. या सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं, असं म्हणत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या आधारेच ओबीसींना आरक्षण दिलं. त्यासाठी त्यांनी अध्यादेश काढला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. महाविकास आघाडी सरकार झोपलं आहे. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं. त्यामुळे या सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नाशी केंद्राचा संबंध येत नाही. हा राज्याचा विषय आहे. राज्य सरकार खोटं बोलत आहे. सरकारने तातडीने डाटा तयार करावा. एका महिन्यात आयोग स्थापन करून तीन महिन्यात डाटा तयार करा आणि तो सुप्रीम कोर्टात दाखल करा, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा- नाना पटोले
खंडणी आणि वसूली हाच शिवसेनेचा धंदा; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल
“जळगावमध्ये भाजपला धक्के सुरूच; आणखी 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”