Home महाराष्ट्र चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले

चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती- नाना पटोले

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दल सांगितलं.

राज्य सरकारनं आता जी प्रक्रिया केली ती वर्षभरापूर्वीच केली असती तर ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकलं असतं, असं मत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

चोराच्या उलट्या बोंबा अशी विरोधी पक्षनेत्यांची स्थिती आहे. 2017 मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा त्यांनी एका अध्यादेशाच्या आधारे या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यावेळी हायकोर्टानं जे आदेश दिले होते की तुम्ही मागासवर्ग आयोग बसवा. त्याआधारे इम्पिरिकल डेटा गोळा करुन ओबीसींची संख्या किती आहे ते कळवा. आपण तर करु शकले नाहीत., असं नाना पटोले यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मागासवर्ग आयोगाचं गठन करुन ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम आघाडी सरकारनं सुरु केलं आहे. त्यामुळे आपली चूक दुसऱ्यावर ढकलण्याची आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांची परंपरा राहिली, ती आज पुन्हा दिसून आली. तसेच ओबीसींचं राजकीय आरक्षण कमी करण्यामागे भाजपचा सर्वात मोठा हात असल्याचं आम्ही वारंवार सांगितलं आहे आणि आजही ते स्पष्ट होतंय, असंही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा पोरींवर उडवत आहेत; करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

अनिल देशमुखांना फरारी घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्या यांची मागणी

“माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस”

चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी