“चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही”

0
171

पंढरपूर : चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून 5 वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही., असा टोला चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेनं धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे., असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून पाच वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान, या मेळाव्यादरम्यान चंद्रकांत पाटीलांनी शिवसेना आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष होत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अपयशी ठरलं असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुडाचे उत्तर सुडाने देऊ म्हणणं म्हणजे संविधानाचा अपमान- प्रविण दरेकर

…जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित

“जगप्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन”

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here