Home महाराष्ट्र 10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

10 दिवसात मंदीरे खुली करा अन्यथा…; अण्णा हजारेंचा सरकारला इशारा

अहमदनगर : राज्य मंत्रिमंडळाची पार पडलेल्या बैठकीत राज्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हॉटेल, रेस्टॉरंट, विवाह सोहळे आदिंना मोठा दिलासा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र या निर्बंधात धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

10 दिवसांत मंदिरं खुली करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर जेलभरो आंदोलन करा, मी तुमच्या सोबत आहे, असा इशारा अण्णा हजारे यांनी यावेळी दिला. आज अहमदनगरच्या मंदिर बचाव समितीनं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. बंद मंदिरे खुली करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी अण्णांकडे केली. यावेळी हा इशारा अण्णांनी सरकारला यावेळी दिला.

दरम्यान, राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का? जिथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल अण्णांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा

महाविकास आघाडी पाच वर्ष नाही, तर पुढील 25 वर्षे राज्याची सेवा करणार- सुप्रिया सुळे

वंचितला धक्का! आणखी 2 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अजित पवारांची भेट यशस्वी ठरली

“दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, कोण श्रेय देणार?”